आ आशुतोष काळेंनी दिलेला शब्द पुर्ण केला :- नवाज कुरेशी
नागरिकांनी मानले आ.काळेंचे आभार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
आमदार आशुतोष काळे यांच्या निधीतुन प्रभाग क्रमांक ७ मधील आयेशा काॅलेनीतील वसिम खाटीक घर ते जुबेर खाटीक घर या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण झाले त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांचे प्रभाग सात मधील रहिवास्यांनी आभार.मानले असुन आ.काळेंनी दिलेला शब्द पुर्ण केल्याची भावना नवाज कुरेशी यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ७ मधील आयेशा काॅलेनी येथील वसिम खाटीक घर ते जुबेर खाटीक घर या रस्त्याची खुपच दयनीय अवस्था झाली होती पावसाळ्यात या रस्त्याने जाण्यासाठी खुप मोठी कसरत करावी लागत होती. लहान, मोठे व वयोवृद्ध सर्वच नागरिकांचे या रस्त्याने चालणे मुश्किल झाले होते व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे होते व या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात सतत चिखल असायचा, त्यामुळे नेहमी अपघात होऊन नागरिक जखमी होत होते.
खराब व कसरती रस्त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांपर्यंत रुग्णवाहिका, गॅस गाडी व घंटा गाडी येत नव्हती ही सर्व अडचण आम्ही आमदार आशुतोष काळे यांना सांगितली व त्यांनी तुम्हाला येथे चांगला व मजबूत रस्ता करुन देतो असे सांगितले व काहीच दिवसात या रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पंधरा लाख रुपयांचा निधी दिला. निधी नगरपालिकेत वर्ग होऊन हे काम होत नव्हते तेव्हा मी व या भागातील नागरिकांनी चिखलात बसुन अंदोलन केले व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोनच दिवसात या रस्त्याची निविदा काढली व थोड्याच दिवसात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले व आज या रस्त्याचे डांबरीकरण होऊन हा रस्ता मजबूत झाला असुन या भागातील नागरिकांची गैरसोय दुर झालेली असून येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केल्याचे नवाज कुरेशी यांनी सांगितले .



.jpg)


