धारणगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी बाबासाहेब वाघ
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे . यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षापूर्वी धारणगाव ग्रामपंचायत मध्ये काळे गटाचा पराभव करत कोल्हे गटाने सत्तांतर घडवून मोठ्या फरकाने सरपंच व सदस्य निवडून आले होते. रोटेशन पद्धत ठरल्याप्रमाणे मावळते उपसरपंच गणेश थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे. नवीन उपसरपंच म्हणून बाबासाहेब वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली.
लोकनियुक्त सरपंच सौ वरूणा दीपक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सभेत उपसरपंच पदासाठी सदस्य अण्णासाहेब रणशूर यांनी बाबासाहेब वाघ यांच्या नावाचीसूचना मांडली व माजी उपसरपंच गणेश थोरात यांनी
अनुमोदन दिले उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे बाबासाहेब वाघ यांची बिनविरोध निवड झाली. या प्रसंगी मा उपसरपंच गणेश थोरात यांचा सत्कार केला व नवीन उपसरपंच यांचाही सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रमेश घोडेराव माजी संचालक दगुराव चौधरी लोकनियुक्त सरपंच सौ वरूणा दीपक चौधरी नानासाहेब थोरात सोपानराव वाहाडणे तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ वहाडणें. सोसायटी संचालक तुकाराम रणशूर. मा उपसरपंच दशरथ मोरे. संदीप चौधरी दिपक सुरे ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री संदीप भिकाजी थोरात सौ कविता संतोष चौधरी ,गणेश अप्पासाहेब थोरात, अण्णासाहेब रखमजी रणशुर, कु मोहिनी विठ्ठल मोरे, सौ माधुरी सुरज रणशूर ,सौ पुष्पा मच्छिंद्र जाधव, सौ सोनल सुदर्शन कुहिटे ,ग्राम अधिकारी पूनम अहिरे यांचे सह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.