banner ads

रवंदे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना डस्टबीनचे वाटप

kopargaonsamachar
0

 रवंदे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना डस्टबीनचे   वाटप


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

गावात ग्रामस्थांनी स्वच्छतेचा वसा घेऊन आपले आणि गावाचे आरोग्य निरोगी ठेवावे यासाठी कोपरगाव तालुक्यातील   रवंदे ग्रामपंचायत ने ७०० कुटुंबांना डस्टबीनचे वाटप गावच्या सरपंच शोभाताई भवर ,उपसरपंच ऋषिकेश कदम , ग्रामविकास अधिकारी राजेंद्र   बागले , भाऊसाहेब घोटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


घरातील कचरा परिसरातील केरकचरा यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने गावात घंटागाडी  सुरू केली असुन जो कचरा रस्त्यावर इकडे तिकडे टाकला जात होता तो आता नियमित प्रत्येकाच्या घरापाशी घंटागाडी जाऊन त्यात कचरा जमा होऊ लागल्याने गावाच्या सुंदरतेत आणखीन भर पडल्याचे दिसते. जमा झालेल्या केरकचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर शेतीसाठी करण्यात येऊ लागल्याचे उपसरपंच  ऋषिकेश कदम यांनी सांगितले .

गावात कचऱ्याची घंटागाडी सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असुन. प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व समजल्यामुळे घराघरात कचरा कुंड्यांचा वापर सुरू झाला. गाव स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होताना दिसत आहे या उपक्रमासाठी अनेक ग्रामस्थांचे सहकार्य लाभले 




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!