banner ads

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक स्वावलंबन शक्य - सौ. छाया वैद्य

kopargaonsamachar
0

बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक स्वावलंबन शक्य - सौ. छाया वैद्य

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

  बहुतांश महिला शिक्षित असुन रोजगाराच्या शोधात असतात. त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते स्वतःचा एखादा उद्योग सुरू करण्यास इच्छुक असतात. परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांच्या जवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते व ते स्वतःचा एखादा लघु-उद्योग सुरु करण्यासाठी असमर्थ ठरतात.  बहुतांश बँका व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था महिला उद्योजकांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात कारण महिला कर्जाची रक्कम परत फेडू शकतील याची त्यांना शाश्वती नसते. त्यामुळे महिलांचे स्वतःचा उद्योग सुरु करण्याचे स्वप्न अपूर्ण राहते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या योजनेतून महिला आर्थिकदृष्ट्या  सक्षम होणे शक्य आहे. असे प्रतिपादन सौ छाया वैद्य यांनी केले.


येथील एस. एस. जी. एम. कॉलेजच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि महिला कल्याण व स्त्री सबलीकरण समिती अंतर्गत 'निर्भय कन्या अभियान कार्यक्रम' नुकताच संपन्न झाला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून सौ छाया वैद्य बोलत होत्या.
सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेल्या  सौ. सविता राजपूत- परदेशी यांनी,  महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार झालेल्या वस्तूंना परदेशात देखील मागणी आहे.त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त बचत गटाचा लाभ घ्यावा. असे आवाहन  केले. 


या प्रसंगी गोरक्ष बढे यांनी, विद्यार्थिनींना स्व-संरक्षणाचे धडे दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात  महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. माधव सरोदे यांनी, महाविद्यालय हे विद्यार्थिनींना  सक्षम व निर्भय बनविण्यासाठी घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा घेवून  महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी  बचत गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध  संधींचा लाभ घ्यावा.असे आवाहन  केले
.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व  मान्यवरांचा परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. वैशाली सुपेकर  यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. उज्ज्वला भोर, प्रा.डॉ.माधव यशवंत, डॉ.संगीता दवंगे, डॉ.वंदना प्रा.अश्विनी पाटोळे . इ.सह महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका व मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनीं उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.भागवत देवकाते  यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.सीमा दाभाडे यांनी  मानले.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!