banner ads

ऐतिहासिक स्थळे सुशोभिकरण व प्रेक्षणीय करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी

kopargaonsamachar
0

 ऐतिहासिक स्थळे सुशोभिकरण व प्रेक्षणीय करण्यात लोकप्रतिनिधी अपयशी 


 नितीन शिंदे यांचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

 कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगांव तालुक्यातील पुर्वी चे ऐतिहासिक गावे शिर्डी व पुणतांबा गमावल्या नंतर पारंपारिक लोकप्रतिनिधी  हे कोपरगांव तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे सुशोभिकरण व प्रेक्षणीय करून नवीन पिढीला प्रेरणादायी ठरतील असे  उपलब्ध करून देण्यात पुर्णपणे अपयशी ठरले असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काॕग्रेस कमिटीचे सचिव नितीन शिंदे यांनी नामदार देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी येथे प्रत्यक्ष भेट घेत दिले.

महाराष्ट्र प्रदेश काॕग्रेस कमिटीचे सचिव नितीन शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोपरगावास एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे ते पेशवाईच्या काळात रघुनाथराव पेशव्यांमुळे रघुनाथराव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र व नानासाहेबांचे धाकटे बंधू. अटकेपार मराठेशाहीचे झेंडे फडकवणारे पराक्रमी पुरुष. त्यांना राघोबादादा, राघोभरारी अथवा दादासाहेब या नावांनी ओळखले जाते. दादांना गोदाकाठ फारच आवडत असे, त्यांचे दोन वाडे कोपरगावात होते
एक बेट-कोपरगाव येथे शुक्राचार्य मंदिराच्या जवळ असून दुसरा शहरात होता. बेटातील वाडा सध्या अस्तित्वात नाही. दुसरा वाडा शहरात  आहे. तसेच १७८३ मध्ये कोपरगावजवळील ‘हिंगणी’ येथे एक वाडा बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते परंतु तो पूर्ण होऊ शकला नाही.


१८१८ ला मराठेशाहीच्या पतनानंतर वाडा इंग्रजांच्या ताब्यात आला. त्यांनी तेथे अनेक प्रशासकीय कार्यालये सुरू केली. मधल्या काळात वाड्यात अनेक फेरबदल व दुरुस्त्या झाल्याने तसेच वाड्याची बरीच पडझड झाल्याने वाड्याची अंतर्गत रचना पूर्वी कशी होती याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्वातंत्र्यानंतर तेथे मामलेदार कचेरी सुरू करण्यात आली. नंतरच्या काळात वाडा पुरातत्व विभागाकडे देण्यात आला. पेशवेकालीन वैभवाचा मुक साक्षीदार असणारा हा वाडा काष्टकामाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या राज्य संरक्षित स्मारकात वाड्याची नोंद असून वाड्याच्या डागडुजीचे काम सध्या संथगती ने प्रशासनातर्फे चालू आहे. स्मारकाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण व बकालपणा हटवून येणा-या नवीन पिढीला मराठा साम्राज्य शौर्याचा प्रेरणादायी इतिहास नक्कीच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे . तसेच नवीन पिढीला या इतिहासाची माहिती देणे फार महत्वाचे असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काॕग्रेस कमिटीचे सचिव नितीन शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!