शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश किरण वापरास बंदी
वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत.
शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत असतात आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण (एटीसी) टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो. शिर्डी विमानतळ परिसरातील २५ किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात.









