banner ads

के. जे. सोमैया महाविद्यालयात 'रस्ता सुरक्षा : जीवन सुरक्षा' अभियान

kopargaonsamachar
0

 के. जे. सोमैया महाविद्यालयात 'रस्ता सुरक्षा : जीवन सुरक्षा' अभियान 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

  के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व शहर पोलिस स्टेशन, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना' उपक्रमाअंतर्गत 'रस्ता सुरक्षा : जीवन सुरक्षा' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


या उपक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक  भगवान मथुरे , श्रीकांत कुऱ्हाडे हे उपस्थित होते. यावेळी  भगवान मथुरे यांनी 'रस्ता सुरक्षा व नागरिकांचे कर्तव्य' या विषयावर बोलतांना रस्ता सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी असुन वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. 


रस्ते अपघातात होणाऱ्या जीवितहानीची बाब गंभीर असून त्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहीजे असे म्हटले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दुचाकी वर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूक परवान्याची सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. 


या अभियानाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संजय दवंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापिका आवारे, प्राध्यापिका कदम, प्राध्यापिका अहिरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व इतर विद्यार्थी उपस्थित होते.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!