विज्ञान - गणित प्रदर्शनात देर्डे चांदवड शाळा प्रथम
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ५२ व्या गणित विज्ञान व पर्यावरण तालुकास्तरीय प्रदर्शनात कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवी गटात असलेल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत. प्रथम क्रमांक पटकावत आपल्या शाळेचे नाव उंचावले आहे.
कोपरगाव पंचायत समिती व विज्ञान गणित शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संवत्सर येथे ५२ तालुकास्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
इयत्ता पहिली ते पाचवी गटात प्रथम क्रमांक मिळवला असून आता या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे देर्डे चांदवड ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.








