banner ads

फ्लेक्स ने शहराचे विद्रुपीकरण करण्यात हातभार कोणाचा

kopargaonsamachar
0

 शहराचे विद्रुपीकरण करण्यात हातभार कोणाचा



कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

जाहिरात करायची आहेत का, शुभेच्छा फलक लावायचे का, तर मग वाट कसली बघता कोपरगाव नगर परिषद हद्दीत तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी फलक लावा... अन आपली जाहिरात करा. आता अशीच वेळ कोपरगाव शहरात म्हणायची वेळ आली आहेत. कोपरगाव नगर पालिकेचा कोणताही धाक नसल्या कारणाने कोणी कुठेही भले मोठे फ्लेक्स लावत आहेत. वाटलं तर पावती फाडली जाते नाही तर असेच कोणीही फ्लेक्स लावा, कोणीही
विचारणारे नाही. 


  कोपरगाव शहरामध्ये अनधिकृत जाहिरात फलक होर्डिंग व्यावसायिकांनी शहराला पूर्णतः विद्रूप करण्याचा जणू विडाच उचलला आहे. कोणत्याही हौशा- गौशाच्या वाढदिवसाच्या जाहिरातीचे फलकाने शहराला वेठीस धरले आहे. त्यात पालिकेचे काही अधिकारी चिरीमिरी घेऊन परस्पर या फलकांन परवानगी देत असल्याचे बोलले जात आहे. 

कोपरगाव शहर काही दिवसांपूर्वी धुळगाव म्हणून ओळख होती, त्याच्याच जोडीला आता फ्लेक्स चे शहर अशी ओळख निर्माण झाली आहेत. शहराच्या कोणत्याही भागात जा मोठं मोठाले फ्लेक्स दिसतील ह्या फ्लेक्स
मूळ रहदारीला अडथळा होतोय.फ्लेक्स लावलेल्या ठिकाणी व्यापाऱ्यांचे दुकान झाकले जाताय हे कोणीही बघत नाही.
व्यापारी पालिकेत पत्रव्यवहार करून थकून जातात पण डोळ्याला पट्टी लावलेल्या पालिका कर्मचारी
काना डोळा करत आहे.पालिका कर्मचाऱ्यांना ह्या बाबत विचारणा केली असता, कर्मचारी म्हणतात की आम्हाला कोणाचे ही फोन येतात फ्लेक्स राहू द्या,आणि त्या
दबावाखाली कर्मचारी हे अनधिकृत फ्लेक्स तसेच ठेवले जातात.
 पालिकेने शहर स्वच्छ, सुंदर, ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे, परंतु कोपरगाव नगर पालिका च कोपरगाव शहराचे विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत असल्याचे वारंवार दिसून आले आहेत,वेळोवेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते नी ह्या वर आवाज उठवला परंतु कोणतीही कारवाई पालिका करत नाही, कारवाई होत नाही तर
प्रश्न पडतो की कारवाई का होत  नाही.


फ्लेक्स च्या जाहिरात दराच्या पावती वर असा किती पैसा गोळा होतो, आणि पैसा मिळतो म्हणून पालिका असे कुठेही फ्लेक्स लावायला परवानगी देणार का ?  ह्या कडे पालिकेच्या
मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे,
ह्या अनधिकृत फ्लेक्स मुळे ह्या आधी ही अनेक दंगलसदृश्य परिस्थिती कोपरगाव मध्ये निर्माण झाली. बऱ्याच वेळा रोडवरील फ्लेक्स, व कमानी रस्त्याने
येणाऱ्या जाणान्या लोकांच्या अंगावर पडून मोठी दुखापत झाली आहेत, बस स्टैंड समोरील फ्लेक्स इतके मोठे लावलेत की, वरतून जाणाऱ्या विजेच्या तारेला वारे आल्यास स्पर्श होऊन मोठा अनर्थ घडू शकतो. ह्या बलाढ्य
फ्लेक्स मुळे काही अपघात होऊन काही हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार ?  
  या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून कोपरगाव नगर पालिका कारवाई करणार का, की ह्या सर्व तक्रारी कडे 
दुर्लक्ष करून,फ्लेक्स ने शहराचे विद्रुपीकरण करण्यात हातभार लावणार ह्याकडे कोपरगाव करांचे
लक्ष लागून आहेत
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!