banner ads

नदीकाठच्या विद्युत मोटारी चोरींचे प्रमाण वाढले

kopargaonsamachar
0

 नदीकाठच्या विद्युत मोटारी चोरींचे प्रमाण वाढले 


शेतकरी हवालदिल.. पोलीस स्टेशनला फिर्याद

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात विद्युत मोटारी चोरांचा सुळसुळाट वाढला असून एकाच दिवशी तब्बल सहा विद्युत मोटारी या चोरट्यानी चोरून नेत आपली दहशत केली. 


यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून या चोरट्यांच्या विरोधात त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विद्युत मोटारी चोरी झालेली शेतकऱ्यांच्या वतीने कोपरगाव तालुका सचिव संघटनेचे सदस्य रवींद्र गुजर यांनी केले आहे. 
नदीकाठी वेळापूर शिवारात असलेल्या रवींद्र गुजर , सुमनबाई मारुती गुजर यांची दहा एचपी विद्युत मोटर या चोरट्यांनी चोरून नेली आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात देखील रवींद्र गुजर यांच्या विद्युत मोटारीची चोरी झाली होती. त्याचा देखील तपास अद्याप पर्यंत लागलेला नाही.


अशोक रामभाऊ आहेर, पार्वताबाई खंडेराव गुजर, रंजना नारायण जगधने, कृष्णा सोमा तळपाडे यांच्याशी साडेसात एचपी च्या विद्युत मोटारी नदी काठावरून एकाच दिवशी चोरी गेल्या.
विद्युत मोटारी चोरल्यानंतर त्यामधील तार विकून हे चोरटे आपला गोरख धंदा करत आहे. शेतकऱ्यांच्या विविध वस्तूंच्या चोऱ्या करून त्यांनी या परिसरात दहशत केली आहे. प्रत्येक वेळी शेतकऱ्याला २५ ते ३० हजार रुपये खर्च करून विद्युत मोटर विकत घ्यावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला वरील फिर्यादींनी आपल्या मोटारी चोरी गेलेल्या असल्याची फिर्याद दिली आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणाहून चोरी झाली त्या ठिकाणाचा पंचनामा देखील झाला आहे.


मात्र या चोरट्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे असून तालुका पोलीस स्टेशन ने यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!