banner ads

शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू -- मंत्री संजय शिरसाट

kopargaonsamachar
0

 शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू  -- मंत्री संजय शिरसाट 


 शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना पक्षाची ताकद वाढवणे गरजेचे आहे. यासाठी शहरात व तालुक्यात शिवसेनेच्या जास्तीत जास्त शाखा निर्माण करणे गरजेचे आहे. शिवसेना शाखेच्या वतीने शिवसैनिक जोडले की संघटना बळकट होते. कोपरगाव शहर व तालुक्यातील शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाठ यांनी केले. 
ते कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारताना बोलत होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते कोपरगाव येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शन व मंडप एक्सपोचा कार्यक्रम आटोपल्यावर ते येवला येथे आ दराडे यांच्याकडे नगर मनमाड महामार्गहून जात असताना कोपरगाव साईबाबा मंदिर परिसरात शिवसैनिकांनी त्यांचे फटाके फोडत जोरदार स्वागत केले. 
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, बाजार समितीचे संचालक सर्जेराव कदम, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे, देवा लोखंडे, आरतीताई गाडे, मुमताज शेख, शहर प्रमुख अक्षय जाधव, बाळासाहेब बढे, मीनानाथ जोंधळे, घनश्याम वारकर, शिवाजी जाधव, सुनील साळुंके, निलेश चौधरी, मनोज राठोड, पवन गायकवाड, सुनी गायकवाड अदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!