रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतोः- बाळासाहेब रहाणे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
विद्यार्थी दशेत असताना ध्येयातून आपले जीवन समृद्ध करता येते. श्रमसंस्कार शिबिरातून तत्व, यश, वेळेचे व्यवस्थापन या मूल्यांचे शिक्षण मिळते. त्यातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन डी. एन. मार्ट उद्योगसमूहाचे चालक-मालक बाळासाहेब रहाणे यांनी शिबीराच्या समारोप प्रसंगी वेस सोयगाव येथे केले.
यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुभाष रहाणे होते. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व पोहेगाव येथील हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिर समारोप प्रसंगी बोलत होते यावेळी सुभाष रहाणे म्हणाले विद्यार्थी दशेत जीवन जगत असताना जीवनातील संघर्षातून विजय मिळवावा आणि तो
महाविद्यालयाचे संस्थापक नितीनराव औताडे, प्राचार्य डॉ. शांतीलाल जावळे, सरपंच जयाताई माळी, उपसरपंच आनंदा भडांगे, सिकंदर इनामदार महाविद्यालयाचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड, दिपक वाघमारे, प्राध्यापिका भावना गांधीले, प्राध्यापक सचिन भांड, कोमल रोहमारे, एन.पी सांगळे महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते महाविद्यालय संस्थापक नितीनराव औताडे यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग समन्वयक डॉ.बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. श्रमसंस्कार शिबीरातील आपले अनुभव रा.से.यो विद्यार्थी प्रतिनिधी रहाणे वैभव, निकिता घारे, दिपाली रहाणे यांनी आपल्या मनोगतातून मांडले. प्रा. बी. एस. गांधिले यांनी सूत्रसंचालन केले तर डी.एस. वाघमारे यांनी आभार मानले.








