सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र कोळपे
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली देशात नांवाजलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी राजेंद्र निवृत्ती कोळपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
विवेक कोल्हे यांच्या हस्ते मावळते उपाध्यक्ष मनेष गाडे व नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांचा सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देश विदेशातील साखर कारखानदारीचा अभ्यास करून संजीवनीत सर्वप्रथम विविध रासायनिक उपपदार्थाची निर्मीती केली.
त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या
मार्गदर्शनांखाली देशात सर्वप्रथम थेट उसाच्या रसापासुन इथेनॉल उत्पादनात या कारखान्यांने आघाडी घेत औषधनिर्मीती क्षेत्रात पाउल ठेवत त्यासाठीच्या कार्यक्षम आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर संशोधनात्मक प्रयोगशाळांची उभारणी केली आहे.
हंगामी ऐवजी बारमही रोजगार निर्मितीसाठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभारणीबाबत काम सुरू आहे, त्याचबरोबर सी. एन. जी गॅस प्रकल्पाची उभारणी अंतीम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.









