ajinky

banner ads

कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीला ३९ लाख ५१ हजाराचा नफा

kopargaonsamachar
0

कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीला ३९ लाख ५१ हजाराचा नफा

कोपरगांव समाचार:- संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला ३९ लाख ५१ हजार रूपयांचा नफा झाल्याची माहिती अध्यक्ष सुरेश कोंडीराम मगर यांनी दिली.



तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीची ६२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा बुधवारी कारखाना कार्यस्थळावरील संजीवनी उद्योग भवन येथे पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी संस्थेचे आधारस्तंभ माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. सुरेश मगर पुढे म्हणाले की, आमदार विवेक कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे भाग भांडवल ८१ लाख ९ हजार रुपये असुन गुंतवणुक ९ कोटी ७५ लाख रूपये आहे. संस्थेकडे मार्च अखेर ५ कोटी ८७ लाख रूपयांचे फंडस जमा आहेत. १४ कोटी ३३ लाख रूपयांच्या ठेवी असुन १० कोटी ४८ लाख रूपयांचे कर्जवाटप केलेले आहे.संस्थेने सभासदांच्या पाल्यासाठी विद्यार्थी गुणवत्ता निधी स्थापन केला असुन त्यातून अहवाल सालात इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणा-या सभासदांच्या २६ पाल्यांचा रोख बक्षिस व भेटवस्तु देवुन याप्रसंगी सत्कार करण्यांत आला व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. सभासदांनी इतिवृत्तासह विषय पत्रिकेवरील २ ते १३ विषयांना एकमताने टाळयांच्या गजरात मंजुरी दिली.




याप्रसंगी प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे, साखर महाव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार नेते मनोहर शिंदे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, संचालक देवराम देवकर, साईनाथ तिपायले, उत्तमराव शेळके, सुभाष होन, केशव बटवाल, सुदाम उगलमुगले, विलास कहांडळ, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, साई संजीवनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब रक्ताटे, लेबर ऑफिसर एस. सी. चिने, हेडटाईमकिपर बी. एस. बेलोटे, सर्व कर्मचारी वृंद, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक विलास कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष आण्णासाहेब पगारे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!