ajinky

banner ads

कोपरगाव येथे भुत निघाल्याची चर्चा : अंनिसने केले सत्य उघड

kopargaonsamachar
0

 कोपरगाव येथे भुत निघाल्याची चर्चा : अंनिसने केले सत्य उघड

कोपरगाव समाचार :,-कोपरगाव शहरातील बेट भागात भूत निघाल्याची चर्चा पसरली. त्यामुळे अनेक लोक भयभीत झाले . पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने यामागील सत्य शोधून काढले. त्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला .



याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी रात्री समाजमाध्यमात भूत निघाल्याची चर्चा सुरू झाली.सफेद साडीतील एका विचित्र रूप असलेल्या स्री बेट भागात आली व तिने एका माणसावर हल्ला करून जखमी केले. त्या भुतासारख्या दिसणाऱ्या स्रीचे व जखमी झालेल्या व्यक्तीचे फोटो समजमाध्यमात वेगाने पसरले. या. भागाला काही एतेहासिक संदर्भ असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मंगळवारी सकाळी ही बातमी एका जागरूक नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना सांगितली. सदर जखमी झालेल्या व्यक्तीला कोपरगावच्या सरकारी रुग्णालयात भरती केले असल्याचे सांगितले गेले . 




यावर चांदगुडे यांनी अनिसचे कोपरगाव तालुकाध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोक गावित्रे यांच्याशी चर्चा केली. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्यावर असा कुणी व्यक्ती भरती न झाल्याचे निष्पन्न झाले . बेट भागात जाऊन या प्रकारचा त्यांनी सखोल तपास केला. अनेक लोकांनी हे सत्य असल्याचे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी या मागचे सत्य शोधून काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी सदर फोटो ज्यांनी ज्यांनी पुढे पाठवले त्या कोकमठाण व बेट भागातील सर्वांना पोलिस ठाण्यात बोलविले. हे फोटो अमावस्येच्या रात्री
शिर्डीहून झाले असल्याचे निष्पन्न झाले.सदर फोटो बनावट असल्याचेही स्पष्ट झाले.


सदर व्यक्तींनी खोटे फोटो पुढे पाठवल्याची चुकीची कबुली दिली.असे फोटो कुणीही पुढे पाठवू नये असे आवाहन पोलिसांनी केले. जगात भूत अस्तित्वात नसते त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे, दिपक शिरसाठ, कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!