ajinky

banner ads

मायगाव देवी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट

kopargaonsamachar
0

मायगाव देवी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट

कोपरगाव समाचार :--: कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी शिवरातील कमळजा परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये बिबट्या दिसून येत असल्याने शेतकरी शेताकडे जाण्यास धजावत आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासह शेतीची विविध कामे करण्यावरही त्याचा परिणाम होत आहे.




सध्या पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेषतः ऊस आणि मका पिकांमध्ये बिबट्या लपून बसत असल्याने शेतात काम करण्यासाठी मजूरही सहज तयार होत नसल्याचे चित्र आहे.
परिसरातील गोरक्षनाथ खैरे या शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली असून. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत अधिकच वाढली असतानाच गिरिधर खैरे यांच्या वस्तीवर येऊन गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे.




 बिबट्याचा वावर मानवी वस्तीजवळही होत असल्याने शेतकरी, महिला, लहान मुले तसेच पशुधनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यासंदर्भात वनविभागास कळविले असता त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून सदर परिसरात बिबट्या पकडण्यासाठी बुधवार दिनांक २ रोजी सायंकाळी पिंजरा लावला असला तरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळत आहेत. ऊस व मका यांसारख्या दाट पिकांमध्ये बिबट्या दबा धरून बसण्याची शक्यता असल्याने शेतात प्रवेश करताना भीतीचे वातावरण आहे.

पिंजरा लावला असला तरी बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने परिसरात तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप किंवा इतर आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!