ग्रामस्थांच्या मागणीवरून कोल्हेंचा पाठपुरावा,मढी बु.च्या रस्ते विकासाला मिळाली गती
कोपरगाव समाचार :--कोपरगाव मतदारसंघातील मौजे मढी बु. येथे माहेगाव देशमुख रस्ता ते शिलेदार वस्तीपर्यंतच्या रस्त्याच्या खडीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या विकासाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या मागणीला आता न्याय मिळाला असून, रस्ते विकासाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे आणि आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नातून हे महत्त्वपूर्ण काम मार्गी लागले आहे. या रस्त्यामुळे मढी बु. परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच दैनंदिन कामासाठी ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या दळणवळणाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच नागरिकांची दैनंदिन ये-जा यासाठी या रस्त्याचे महत्त्व मोठे आहे. रस्त्याच्या खडीकरणामुळे परिसरातील वाहतुकीला मोठा आधार मिळणार असून, पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी कमी होण्यासही मदत होणार आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.भूमिपूजन कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आमदार सौ. स्नेहलता कोल्हे आणि आमदार विवेक कोल्हे यांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या मागण्या आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी दिलीपराव गवळी, नानासाहेब कारभारी गवळी, आण्णासाहेब गवळी, चिमणराव रामकृष्ण गवळी, एकनाथ रामकृष्ण गवळी, एकनाथ गंगाधर गवळी, ग्रामसेवक रामेश्वर नेवगे, नानासाहेब रंभाजी गवळी, रंगनाथ गमे, दशरथ गमे, विलास तनपुरे, बबन राजगुरू, विजय दिघे, राहुल गवळी, संतोष गवळी, कृष्णकांत गवळी, अनिल अशोक गवळी, राजेंद्र गवळी, चंद्रभान गमे, दगडू विठ्ठलराव गवळी, गणपत गुंजाळ, कचरू खरणार, कैलास शिलेदार, दिलीप शिलेदार, गुलाबराव गमे, तुकाराम गमे, रविंद्र डहाळे, बाळासाहेब गमे, दिपक गमे, शिवम गमे, प्रविण घोलप, संभाजी गवळी, अमोल दिघे आणि रितेश औताडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





