ajinky

banner ads

अन्नदानाची सेवा सुरू केल्याने नगदवाडीच्या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त ---.महंत रमेशगिरी महाराज .

kopargaonsamachar
0

अन्नदानाची सेवा सुरू केल्याने नगदवाडीच्या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त ---.महंत रमेशगिरी महाराज 

कोपरगाव समाचार :--कोपरगाव तालुक्यातील नगदवाडी अखंड हरिनाम सप्ताहाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने भजनी मंडळ ग्रामस्थ व सप्ताह कमिटीने एकत्र येत रात्री सात ते नऊ किर्तन सेवा घेऊन कीर्तनानंतर आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाच्या पंक्तीचे आयोजन केले आहे. अनादी काळापासून अन्नदान सेवेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. अन्नदानाची सेवा सुरू केल्याने नगदवाडीच्या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत जनार्धन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांनी केले तर सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नगदवाडी ग्रामस्थ एकत्र येतात. चाळीस वर्षापासून सुरू असलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही जोपासतात धार्मिक कार्याला दिलेले दान केलेली सेवा कधीच वाया जात नाही असे मंहत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी सांगितले.



सप्ताहचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भागवताचार्य कविताताई साबळे , संतोष महाराज व अखंड हरिनाम सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सप्ताह काळामध्ये दररोज रात्री सात ते नऊ किर्तन सेवा व रात्री कीर्तनानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मनसुख महाराज दहे, मेजर भास्कर महाराज भाईक, भागवताचार्य कविताताई साबळे, परशुराम महाराज अनर्थे, रामायणाचार्य बाळकृष्ण महाराज सानप, मयूर महाराज औटी, भागवताचार्य सोनाली दीदी कर्पे यांची कीर्तन सेवा घेण्यात आली आहे. तर शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी पंढरपूर येथील रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांचे काल्याचे किर्तन सकाळी दहा ते बारा वाजता या वेळेत होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दररोज सुरू आहे. 




या कार्यक्रमासाठी सातसंगत मृदंगाचार्य विनायक महाराज मुलगीर, निवृत्ती महाराज पाटील, बाळासाहेब महाराज जाधव, गायनाचार्य संतोष महाराज वाघ, कृष्णा महाराज पोहेकर, ईश्वरीताई महाराज जावळे, शामराव महाराज जावळे, शिवाजी महाराज जगताप करत आहे.अन्नदानाची सेवा 
गहिनीनाथ भानुदास जाधव, राधाची कारभारी जावळे, समस्त सातभाई जावळे परिवार, साहेबराव विष्णू लांडबले, कांतीलाल विष्णू लांडबले, मित्रपरिवार नगदवाडी व कांतीलाल गणपत पोतकुले, बबन महादू साळवे, साहेबराव कारभारी फटांगरे, कारभारी बबन शोधक, छबु महादू साळवे, बबन शंकर खोमणे, केदार जिभाऊ खोमणे, रामदास मलु जावळे यांनी घेतली आहे. काल्याच्या महाप्रसादाची पंगत समस्त ग्रामस्थ नगदवाडी च्या वतीने करण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!