ajinky

banner ads

जुन्या टाकळी रस्त्याचा ‘खड्डेमय’ प्रवास थांबणार?

kopargaonsamachar
0

 जुन्या टाकळी रस्त्याचा ‘खड्डेमय’ प्रवास थांबणार?

खासदार वाकचौरे, आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे नगरसेवक वैभव आढाव यांचे निवेदन
कोपरगाव समाचार :-- कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ तसेच ग्रामीण भागाला शहराशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा MDR-99 जुना टाकळी रस्ता सध्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः खड्डेमय झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून काँक्रीटीकरण व मजबुतीकरण करावे, अशी मागणी नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती वैभव सुधाकर आढाव यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब  वाकचौरे तसेच आमदार विवेक कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



MDR-99 हा केवळ शहरातील अंतर्गत मार्ग नसून, ग्रामीण व शहरी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रस्त्याने शहरातील निवारा,द्वारका नगरी,ओमनगर,सह्याद्री कॉलनी, शंकरनगर, गवारे नगर,खडकी,साई सिटी, समता नगर,द्वारकामाई नगर,साईप्रभा नगर ,गिरमे सिटी,अयोध्या नगर,मदरसा, पवार,साबळे,सानप,वंडांगळे, सपकळ,दराडे, आढाव,कुंढारे,गवारे,नरोडे,देवकरअशा अनेक वस्त्यांना जाणारा महत्वाचा मार्ग आहे वस्त्यांमधील नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते.तसेच तालुक्यातील टाकळी, ब्राह्मणगाव, रवंदे, सांगवी भुसार, धामोरी, चासनळी आदी गावांमधील नागरिकांसाठीही हा मार्ग शहरात ये-जा करण्याचा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.




सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी प्रतिष्ठानांनाही खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. वाहनांची वर्दळ झाली की मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने व्यापारी, कामगार तसेच परिसरातील नागरिकांना वर्षभर धुळीचा सामना करावा लागत आहे. या धुळीमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता असून, रस्त्याच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे या महत्त्वाच्या मार्गाचे काँक्रीटीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी खासदार निधी, पंतप्रधान ग्रामसडक योजना (PMGSY) किंवा केंद्रीय मार्ग निधी (CRF) यापैकी योग्य योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण व शहरी भागातील संपर्क अधिक सक्षम होईल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होईल. तसेच या मार्गालगतच्या परिसराच्या विकासालाही मोठी चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि आमदार विवेक कोल्हे यांनी सदर रस्त्याचा प्रश्न गांभीर्याने घेत लवकरात लवकर प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याचे नगरसेवक वैभव आढाव यांनी सांगितले.
MDR-99 या महत्त्वाच्या मार्गाचा प्रश्न मार्गी लागल्यास शहरातील अनेक वस्त्या तसेच तालुक्यातील विविध गावांना मोठा दिलासा मिळणार असून, नागरिकांचे दैनंदिन दळणवळण अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!