ajinky

banner ads

गंगा गोदावरी महाआरती’ने गोदातीर दुमदुमला!

kopargaonsamachar
0

 गोदामाईच्या साक्षीने भक्तीचा महासागर; ‘गंगा गोदावरी महाआरती’ने गोदातीर दुमदुमला!

कोपरगाव समाचार:--पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त कोपरगाव येथील गोदावरी तीर, लहान पूल येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘गंगा गोदावरी महाआरती’ भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाली. आमदार युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या धार्मिक सोहळ्याला शिवभक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठाचे परमपूज्य परमानंदगिरीजी महाराज, परमपूज्य राघवेश्वरनंदगिरीजी उंडे महाराज यांच्यासह विविध संत-महंतांच्या पावन उपस्थितीत पवित्र गोदामाईची विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी कोपरगावसह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान आणि सर्वांगीण कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
संत-महंतांचे सान्निध्य, गोदामाईच्या आरतीचा भक्तिमय सोहळा, शिवभक्तांची श्रद्धा आणि असंख्य भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण गोदातीर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. श्रावण महिन्याच्या पवित्र प्रारंभाला गोदामाईच्या साक्षीने झालेल्या या महाआरतीने धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला विशेष उंची प्राप्त झाली.




या वेळी मा.आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
महाआरतीसाठी शिवभक्त नागरिक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी,विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते,युवासेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!