ज्या शाळेने घडवले, तिचे ऋण फेडले! चिमुकल्यांना माजी विद्यार्थ्यांकडून स्कूल बॅग
कोपरगाव समाचार:-कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवंगे वस्ती येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भास्कर जाधव हिराबाई जाधव या दांपत्याच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी संगीतमय कवायत देशभक्तीपर गीतावर लेझीम नृत्य सादर करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दवंगे होते.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माजी विद्यार्थी बाबासाहेब जाधव, अनिल दवंगे, अमोल खोंड, नितीन खोंड, गणेश दवंगे, साईनाथ सोनवणे ,रमेश वाघ, विशाल खोंड भारत जानराव ,रणजीत शिंदे शिवाजी शिंदे, संतोष आमले हजर होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप माजी विद्यार्थ्यांनी केले. यावेळी रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, शिष्यवृत्ती गुणवत्ता धारकांना बक्षीस वाटप दत्तू शिंदे ,बाजीराव कांदळकर, नवनाथ जाधव, रामदास खोंड, राधाकिसन खोंड, शंकर उगले , बाळासाहेब जाधव, रवींद्र उगले, तात्या खोंड, पंडित अण्णा खोंड आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
जाधव कुटुंबियांनी दिलेल्या स्नेहभोजनाचा शेवटी सर्वांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ मंडाळकर यांनी केले तर आभार उपशिक्षिका अस्मिता बांगरे यांनी मांडले.





