ajinky

banner ads

मा. आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्तआरोग्यसेवेचा अनोखा उपक्रम

kopargaonsamachar
0

मा. आ. अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्तआरोग्यसेवेचा अनोखा उपक्रम

कोपरगाव समाचार:-कोपरगाव विधानसभा मतदासंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व गर्जे ई.एन.टी. ॲन्ड चाईल्ड केअर, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व नागरिकांसाठी भव्य मोफत कान, नाक, घसा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे मोफत आरोग्य शिबिर बुधवार (दि.१९) रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मवीर शंकरराव काळे सहकार सभागृह येथे पार पडणार आहे.




या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार असून या शिबिरात कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. पूजा वरद गर्जे व त्यांचे सहकारी रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये कानाचे आजार जसे की कान दुखणे, संसर्ग होणे, कमी ऐकू येणे किंवा इन्फेक्शन असणे, सततची सर्दी, ॲलर्जी, नाक बंद होणे व नाकाचे संसर्ग, घसा दुखणे, आवाज बसणे, टॉन्सिलचा त्रास असणे आणि अन्न किंवा पाणी गिळताना होणारा त्रास या आजारांची मोफत तपासणी होणार आहे.





या शिबिराचा कोपरगाव मतदारसंघातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि कारखाना कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!