banner ads

झाड पडले, पण राजकारण उभे राहिले!

kopargaonsamachar
0

 झाड पडले, पण राजकारण उभे राहिले!


स्थानिक व्यावसायिकांचा काळे गटाला खडेबोल

कोपरगाव समाचार:-कोपरगाव शहरात एक झाड अचानक कोसळल्याने या घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पडलेले झाड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा त्वरित कार्यरत करण्यात आली.नगरपरिषदेची अत्याधुनिक गोरखा गाडीही घटनास्थळी पोहोचविण्यात आली होती. झाडाचा आकार मोठा असल्याने ते सुरक्षितपणे हटवण्यासाठी क्रेनचीही मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती.




दरम्यान, या नैसर्गिक घटनेवरून काही राष्ट्रवादी पक्षाच्या काही व्यक्तींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिक दुकानदारांनी झाड पडल्याची माहिती नगरपरिषद प्रशासन तसेच नगराध्यक्षांना दिल्यानंतर तातडीने यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि झाड हटविण्याचे काम सुरू झाले होते.



 अधिकाऱ्यांनी क्रेन मागवले होते ते येण्यापूर्वीच प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात न घेता काही जणांनी या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या संदर्भात स्थानिक व्यावसायिक निसार शेख यांनी परखड भूमिका मांडत अशा प्रवृत्तीवर तीव्र शब्दांत टीका केली. नैसर्गिक आपत्ती किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित घटनांमध्ये राजकारण करण्याऐवजी प्रशासनाला सहकार्य करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.


संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याऐवजी प्रसिद्धीसाठी आरोप-प्रत्यारोप करणे ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असताना प्रत्येक घटनेत राजकीय रंग देण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अशा घटनांमध्ये प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे स्वागत करत, अनावश्यक राजकारण टाळून सकारात्मक सहकार्याची भूमिका घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!