banner ads

येसगाव शिवारात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर

kopargaonsamachar
0

 येसगाव शिवारात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर

जखमी 

कोपरगाव समाचार -:कोपरगावतालुक्यातील नगर–मनमाड महामार्गावरील येसगाव शिवारात शनिवारी दुपारी ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला.

मृत तरुणाचे नाव नितेश रामलाल राठोड (वय २१) तर जखमीचे नाव हेमंत दयाराम राठोड (वय २०, दोघेही रा. विसापूर, ता. चाळीसगाव) असे आहे.




प्राथमिक माहितीनुसार, दोघेही लोणी येथून येवल्याकडे दुचाकीवरून जात असताना येसगाव येथील वळणाजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात नितेश राठोड ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हेमंत राठोड गंभीर जखमी झाला.




घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी तर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, कोपरगाव तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!