banner ads

.संकटाच्या क्षणी कृतीला प्राधान्य

kopargaonsamachar
0

 संकटाच्या क्षणी कृतीला प्राधान्य

आशुतोष काळेंच्या पुढाकाराने मदतकार्याला वेग"

कोपरगाव समाचार: कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर शनिवारी (दि.११) दुपारी साधारण २ वाजण्याच्या सुमारास एक मोठे लिंबाचे झाड अचानक कोसळून शेजारील दुकानांवर पडले. या घटनेत दुकानाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने घटनास्थळी मदतीची व्यवस्था करत झाड हटविण्यासाठी दोन क्रेन उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आणि परिसरातील परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात यश आले.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्तेही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानदारांना मदत करण्याबरोबरच रस्त्यावर पडलेले झाड हटविण्याच्या कामात सहभाग घेतला. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी होऊ नये याची काळजी घेतली.




या प्रसंगी नगरसेवक शैलेश साबळे, इम्तियाज अत्तार, बाळासाहेब रुईकर, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, मयूर राऊत, रितेश राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मदत कार्यामध्ये सहभागी झाले.या घटनेच्या निमित्ताने संकटाच्या प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाण्याची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे नागरिकांनी नमूद केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!