banner ads

बहादरबादच्या बालदिंडीतून विठ्ठल नामाचा गजर

kopargaonsamachar
0

 बहादरबादच्या बालदिंडीतून विठ्ठल नामाचा गजर

कोपरगाव समाचार:-आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद येथे उत्साहपूर्ण वातावरणात बालदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामस्मरण व अभंग म्हणत बालदिंडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मुख्याध्यापक .संतोष पारासुर व उपशिक्षिका श्रीमती सुनीता गुंजाळ यांनी उत्कृष्ट नियोजन केले.



 बालगोपालांच्या बालदिंडीचे गावातील महिला भगिनींनी बाल वारकऱ्यांचे पालखीचे दर्शन घेऊन केलेले स्वागत पाहून मुले भारावून गेली.विद्यार्थ्यांना संस्कार, भक्ती आणि वारकरी परंपरेचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी पालक . बाळासाहेब पाचोरे यांनी बालदिंडीतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली. संदीप पाचोरे, दीपक पाचोरे, राहुल पाचोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याचे आयोजन केले.



 याचबरोबर आपले वडील स्वर्गीय कै. रावसाहेब (आबा) निवृत्ती पाचोरे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद शाळेस ₹१,१००/- रोख देणगी प्रदान केली.या उदात्त व समाजोपयोगी कार्याबद्दल शाळेच्या वतीने पाचोरे परिवाराचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. बालदिंडीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व वारकरी परंपरेबद्दल आदरभाव निर्माण झाला. सर्वांनी बाल गोपाळांच्या दिंडीचे कौतुक केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!