banner ads

युवा पिढीला संस्कार, शिस्त आणि अध्यात्माची दिशा देणारे इस्कॉनचे कार्य प्रेरणादायी – आ. विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 युवा पिढीला संस्कार, शिस्त आणि अध्यात्माची दिशा देणारे इस्कॉनचे कार्य प्रेरणादायी – आ. विवेक कोल्हे

कोपरगाव समाचार:-इस्कॉन कोपरगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेचे कोपरगाव शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विवेक कोल्हे यांनी उपस्थित राहून भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेत रथयात्रेस शुभेच्छा दिल्या. तसेच इस्कॉन संस्थेच्या माध्यमातून समाजात सुरू असलेल्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले.




यावेळी बोलताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, इस्कॉन ही संस्था केवळ धार्मिक कार्यापुरती मर्यादित नसून युवा पिढीला संस्कार, शिस्त, नैतिक मूल्ये आणि अध्यात्माची योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य करत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांना सकारात्मक विचार, व्यसनमुक्त जीवनशैली आणि भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम इस्कॉनच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या कार्याचे सर्वांनी स्वागत करून त्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.




रथयात्रेच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ आणि सुंदर वातावरणात भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथाचे भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वागत केले. आमदार विवेक कोल्हे यांनीही मनोभावे भगवान श्री जगन्नाथांचे दर्शन घेऊन सर्व नागरिकांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी इस्कॉनचे महंत,पदाधिकारी,नगराध्यक्ष पराग संधान,मच्छिंद्र केकान,विजयराव आढाव,राजेंद्र सोनवणे,प्रशांत कडू,विनोद राक्षे, बाळासाहेब नरोडे,प्रसाद आढाव,कैलास मंजुळ,संतोष चवंडके,स्वप्निल मंजुळ,सरपंच संदीप देवकर,डॉ.अमोल अजमेरे, संजय उदावंत,दत्तू पगारे,रोहित कनगरे,स्वराज सूर्यवंशी,अर्जुन माकोने,शैलेश नागरे, आयुब कच्छी आदींसह स्वयंसेवक, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भक्तिमय वातावरण, हरिनाम संकीर्तन आणि जयघोषात पार पडलेल्या या रथयात्रेमुळे कोपरगाव शहर आध्यात्मिक उत्साहाने भारावून गेले. इस्कॉनच्या या उपक्रमामुळे समाजात अध्यात्म, सेवा आणि संस्कारांची प्रेरणा अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!