डॉ.अण्णाभाऊ साठे स्मारकाचे शासकीय लोकार्पण होणार
उपोषण स्थगित,संवादातून निघाला तोडगा
कोपरगाव समाचार:- लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती स्मारकाच्या लोकार्पणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या समाजबांधवांची नगराध्यक्ष पराग संधान,राजेंद्र सोनवणे,विनोद राक्षे,राजेंद्र बागुल,विजय वाजे,प्रशांत कडू,आकाश वाजे,कैलास मंजुळ,फिरोज पठाण, दत्तू पगारे,सोमनाथ म्हस्के,रोहित कनगरे,शरद त्रिभुवन, उमेश धुमाळ, सतीश रानोडे, जयवंत मरसाळे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे,रवींद्र सानप, रवींद्र शेलार,रोहिदास पाखरे, फकीरमहमद पहिलवान,इरफान कुरेशी रोहिदास पाखरे, शंकर बिराडे यासह नगरसेवक,पदाधिकारी,अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या सविस्तरपणे जाणून घेतल्या.
यावेळी उपस्थित समाजबांधवांना स्पष्ट केले की, कोपरगाव नगर परिषद यापूर्वीपासूनच त्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक व कृतिशील भूमिका घेतलेली आहे.लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळा नगरपरिषदेच्या माध्यमातून शासकीय पद्धतीने व्हावा यासाठी समाजबांधवांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
यासह साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे नाव हे आहे तेच राहणार आहे.वास्तविक पाहता नाट्यगृहाची जागा ही कराराने असून सदरचा करार संपुष्टात आलेला होता.२०२४ पासून त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नव्हती त्यानंतर नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या काळात मार्च २०२६ मध्ये या कामाला गती मिळाली आहे.पुढील जिल्हाधिकारी स्तरावरील कार्यवाही करण्याचे काम सुरू आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी देखील जिल्हाधिकारी व शासन स्तरावर या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी मागणी केलेली आहे. यासह अपेक्षित मागण्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी स्पष्ट केले.
पूर्णाकृती स्मारकाच्या लोकार्पणाबाबत सकारात्मक दखल घेण्यात आली आहे. शासकीय पद्धतीने नगरपरिषदेच्या माध्यमातून लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नगराध्यक्षांच्या सकारात्मक भूमिकेवर विश्वास व्यक्त करत समाजबांधवांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत आज हे उपोषण अधिकृतपणे सोडविण्यात आले.
संवाद, समन्वय आणि सकारात्मक कृतीच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न कायम असतो, हीच भूमिका यावेळी पुन्हा संधान यांनी अधोरेखित केली. प्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक, अधिकारी, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्जुन मरसाळे,नितीन साबळे, फकीरा चंदनशिव, रवींद्र डोलारे, शरद त्रिभुवन यांनी उपोषण केले होते त्यांना अपेक्षित भुमिका नगरपरिषदेची असल्याने त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.








