banner ads

एआय'च्या मदतीने शेतकरी व साखर उद्योगाची प्रगती साधणार – आ. विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 एआय'च्या मदतीने शेतकरी व साखर उद्योगाची प्रगती साधणार – आ. विवेक कोल्हे

कारखान्याच्या मिल रोलरची पुजा संपन्न
कोपरगाव समाचार:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२६.२७ हंगामाच्या मिल रोलरची पुजा चेअरमन आमदार विवेक कोल्हे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते संपन्न झाली.प्रारंभी प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली चालु वर्षी कारखान्यांने सात लाख मे. टन गाळपाचे उददीष्ट ठेवले असल्याचे सांगितले.




आमदार विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करत देशात सर्वप्रथम बायो सीएनजी व पोटॅश ग्रॅन्युएल खत, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्माती प्रकल्प सुरू करत सभासद शेतक-यांच्या उस उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर धडक मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. गेल्यावर्षी कारखान्यांने बॉयलर, बॉयलिंग हाउस सह प्रतिदिन गाळपात आधुनिकीकरण करत आवश्यक तेथे मशिनरीमध्ये सुधारणाही केल्या आहेत तेंव्हा कामगार बांधवासह अधिकारी, खाते प्रमुख, उप खातेप्रमुख आदि घटकांनी चालु वर्षी ठेवलेले गाळपाचे उददीष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वतोपरी योगदान द्यावे. देश विदेशातील ज्ञान आत्मसात करून माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत केलेल्या कामातुन प्रेरणा घेत आपण मार्गाक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे.



 कृत्रिम बुध्दीमत्ता एआयचा वापर करून सभासद शेतक-यांसह साखर कारखानदारीवर अवलंबुन असलेल्या सर्वच घटकांची प्रगती आपल्याला साधायची आहे असेही ते म्हणाले.
सीओओ शिवाकुमार, तांत्रीक सल्लागार सीमांचल पांडा, मुख्य अभियंता महंतेश तोडकर, उपमुख्य रसायनतज्ञ हरेराम गोंड यांचा कारखान्याच्यावतीने सत्कार करण्यांत आला. 

याप्रसंगी संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, रमेश घोडेराव, बाळासाहेब वक्ते, निलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, बापूसाहेब बारहाते, विलासराव माळी, बापूराव औताडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, कामगार नेते मनोहर शिंदे, संभाजीराव बोरनारे, सर्व खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!