banner ads

गावठी कट्ट्यामुळे कोपरगावात खळबळ बंद सरकारी जागेचा गैरवापर ?

kopargaonsamachar
0

गावठी कट्ट्यामुळे कोपरगावात खळबळ; बंद सरकारी जागेचा गैरवापर?

कोपरगाव समाचार:-कोपरगाव शहरातील इंडोर गेम संकुल परिसरातील नगरपालिकेच्या मालकीच्या बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये शुक्रवारी (३ जुलै) सकाळी साफसफाई सुरू असताना एका खोलीत गावठी कट्टा आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली.




मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिका कर्मचारी बंद पडलेल्या स्विमिंग पूल परिसराची स्वच्छता करत होते. यावेळी एका खोलीतील कचरा हटवित असताना कर्मचाऱ्यांना संशयास्पद अवस्थेत गावठी कट्टा दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. 




पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी कट्टा ताब्यात घेतला असून तो तेथे कसा आला, कोणाचा आहे आणि त्यामागे कोणाचा संबंध आहे, याचा तपास सुरू केला आहे.


बंद असलेल्या शासकीय मालमत्तेत गावठी कट्टा सापडल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!