banner ads

पोलीस पाहताच दोघे पसार; साथीदार गांजासह पोलिसांच्या जाळ्यात

kopargaonsamachar
0

 पोलीस पाहताच दोघे पसार; साथीदार गांजासह पोलिसांच्या जाळ्यात

कोपरगाव समाचार :-कोपरगाव तालुक्यातील मढी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि कोपरगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ४.२५० किलो गांजासह एका आरोपीला अटक केली. या कारवाईत एकूण १ लाख ६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कोपरगाव तालुक्यात माहिती संकलित करत होते.




यावेळी गुप्त बातमीदारामार्फत दत्तू रतन महाजन (वय ४५, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) याला नाशिक येथील दोन अनोळखी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सहकार्याने मढी फाटा येथे सापळा रचण्यात आला.
दरम्यान, कोळपेवाडीच्या दिशेने मोटारसायकलवरून दोन व्यक्ती घटनास्थळी आल्या. पोलिसांची चाहूल लागताच त्या दोघांनी मोटारसायकलवरून पळ काढला. मात्र, घटनास्थळी उभ्या असलेल्या दत्तू महाजन याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत ४.२५० किलो गांजा आढळून आला.

या कारवाईत १,०६,२५० रुपयांचा गांजा आणि ५०० रुपयांचा मोबाईल फोन, असा एकूण १,०६,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भिमराज खर्से यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८१/२०२६ नोंद करण्यात आला असून, एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!