एस.एस.जी.एम. महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा होणार शुभारंभ
कोपरगाव समाचार :-ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना पोलीस दलात करिअरची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या अकॅडमीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तथा शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या हस्ते होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन अॅड. संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ (काका) शिंदे, मा. आमदार रोहित पवार, आमदार विवेक कोल्हे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेश बोळीज, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य सौ. चैताली काळे, सुनील गंगुले तसेच निमंत्रित सदस्य महेंद्र काले, डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, बाळासाहेब आव्हाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुदाम शेळके (ज्ञानदा अकॅडमी, सिन्नर), सागर खालकर (एस. के. फिटनेस अकॅडमी, संगमनेर),. साईनाथ वर्पे (आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी), साजन चव्हाण, भरतीपूर्व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली ही अकॅडमी ग्रामीण व शहरी भागातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागामध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेची तयारी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत मार्गदर्शन व तज्ज्ञांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या संधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले आहे.






