banner ads

येसगावातील ४० महिला भाविकांना कोल्हे यांच्या पुढाकारातून पंढरपूर दर्शन

kopargaonsamachar
0

 येसगावातील ४० महिला भाविकांना कोल्हे यांच्या पुढाकारातून पंढरपूर दर्शन


अमित कोल्हे व डाॅ. मनाली कोल्हे यांचे कडून भाविकांना शुभेच्छा
कोपरगाव समाचार :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त येसगाव येथील ४० महिला भाविकांना आरामबसद्वारे पंढरपूर वारीसाठी रवाना करण्यात आले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ  स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांच्या पुढाकारातून हा भक्तिमय उपक्रम आयोजित करण्यात आला. वारीसाठी रवाना होण्यापूर्वी कोल्हे दांपत्याने सर्व महिला भाविकांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सुखरूप व मंगलमय वारीसाठी प्रार्थना केली.




   यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. मनाली कोल्हे म्हणाल्या की, येसगावला समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे जन्मगाव म्हणून येसगावची स्वतंत्र ओळख आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांच्या जतनासाठी त्यांनी नेहमीच योगदान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी गावातील ग्रामस्थ समर्थपणे पार पाडत आहेत. या पवित्र आषाढी वारीसाठी महिला भाविकांना निरोप देताना कोल्हे परिवाराला विशेष आनंद होत आहे.




     त्या पुढे म्हणाल्या की, आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून श्रद्धा, समता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी महान परंपरा आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या  प्रत्येक भाविकाला अध्यात्मिक ऊर्जा मिळते. महिलांना या पवित्र सोहळ्यात  सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देणे, ही समाजाप्रती आपली बांधिलकी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
     या उपक्रमामुळे महिला भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांनी कोल्हे दांपत्याचे आभार मानत, अशा सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली.
   येसगावातून विठ्ठलाच्या नामघोषात आणि भक्तिमय वातावरणात आरामबस पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रसंगी ग्रामस्थ, महिला भाविक आणि कोल्हे परिवाराचे सदस्य मोठ्या  संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळीः संजीलवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ  स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांचे समवेत पंढरपुरला रवाना झालेल्या महिला भाविक व इतर.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!