banner ads

जीवनाला आनंदाचे क्षण देणारे व्यासपीठ म्हणजे कराओके : अॅड. रविकाका बोरावके

kopargaonsamachar
0

 जीवनाला आनंदाचे क्षण देणारे व्यासपीठ म्हणजे कराओके : अॅड. रविकाका बोरावके

कोपरगाव समाचार:- जीवनातील ताणतणाव घालवून तणावमुक्त जीवनात निख्खळ आनंदाचे चारक्षण देणारा समुह म्हणजे "कराओके" गायकांच्या समुह असल्याचे उद्गार ग्रीड इंडियाचे संचालक व ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अॅड. रविकाका बोरावके यांनी एका कार्यक्रमात काढले.




कराओके सिंगर्स क्लब, कोपरगांव तृतीय वर्षपूर्ती निमित्त ग्रीड इंडिया संचालक अॅड.रविकाका बोरावके, सौ. पुष्पाताई अशोकराव काळे, ज्योती नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,कोपरगांव, संजीवनी युवा प्रतिष्ठान, हाॅटेल भागिरथीचे संचालक गणेश आढाव यांच्या सौजन्याने आणि कराओके समुहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे यांच्या संकल्पनेतून कोपरगांवातील हौशी गायकांच्या सहभागातून रोहित दुग्गल म्युझिक (आर.डी. म्युझिक) अॅकॅडमी ,श्रीरामपूर, वादकांसमवेत लाईव्ह ऑर्केस्ट्रा हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील गाण्यांची सुरेल मैफील "ये शाम मस्तानी म्युझिकल कॉन्सर्ट" विशेष कार्यक्रमाचे आयोजन कृष्णाई बँक्वेट हॉल, कोपरगांव येथे करण्यात आले होते.




कार्यक्रमास ग्रीड इंडिया संचालक अॅड.रविकाका बोरावके, सौ. पुष्पाताई काळे, सौ. रेणुका कोल्हे,गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे, संजीवनी सैनिकीचे संचालक सुमित कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान, मा. उपनगराध्यक्ष गणेश आढाव, स्वच्छतादूत सुशांत घोडके, धर्मयोद्धा भिमराव बडदे प्रतिष्ठानचे संचालक सागर बडदे आदींसह वैद्यकीय, विधीज्ञ, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोपरगांवातील स्थानिक हौशी गायकांनी वाद्यवृंद यांच्या तालावर आपली गायकी सादर केली यात सहभागी गायक-गायिकांमध्ये प्रा. डॉ. धनंजय क्षीरसागर, अनिल गिड्डे, डॉ. विलास आचारी, प्रा. हरेश चौधरी, अॅड. श्रद्धा जवाद, शंकरलाल टाक, प्रा.डॉ. लक्ष्मीकांत धामंदे, इलियास सय्यद, अनिल जगताप , डॉ. समीर शहा, वसंतराव शिलेदार, कैलास सोमासे, रवी पाटील, सौ. प्रिया ठोळे, सुधीर (राजू) कोयटे, वर्षा सोनवणे, डॉ. अरुण भांडगे, कल्याणी बनसोडे, सौ. वृंदा को-हाळकर, डॉ. सोनिया रणदिवे, प्रमोद को-हाळकर, अॅड. नरेंद्र संचेती, सतीश भोकरे, डॉ. निलेश काबरा, छाया वैद्य, दीपाली क्षिरसागर, मेजर राजेंद्र जगताप, राजेंद्र सोनवणे, प्रा. मिलिंद मुखेडकर, प्रवीण सोमवंशी, विवेक बिडवे, संगीता बनसोडे, डॉ. सुषमा आचारी, राहुल लांडे, गोरख वैद्य, सतिष गर्जे, सौ. स्विटी भुसारी, राजेंद्र वाघ, डॉ. योगेश लाडे, कु. इशिता बनसोडे, संजय मंडलिक, सचिन अमृतकर, बलभिम उल्हारे , रूपाली भोकरे, वैशाली उल्हारे, सादिक पठाण, आनंद सोनपसारे, नितीन वाघ , सुरेखा बिबवे, मिना शिंदे, अनुराधा सोमासे, इरफान शेख, मंटू लोंगाणी,
कार्यक्रमाचे निवेदन कराओके समुहाचे प्रमुख राजेंद्र कोयटे, प्रा. डॉ.शैलेंद्र बनसोडे, प्रिया ठोळे यांनी सादर केले.

रोमँटीक, भाव, विरह गीतांचा मनमुराद वर्षाव कोपरगांवातील स्थानिक गायकांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी कोपरगांवकर रसिकांनी घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!