मोठी स्वप्ने, सातत्यपूर्ण परिश्रम आणि पर्यावरण संवर्धन हाच यशाचा मंत्र : रेणुका कोल्हे
कोपरगाव समाचार:-विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे. मोठी स्वप्ने पाहून सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असे प्रेरणादायी प्रतिपादन संजीवनी शैक्षणिक कृषी आणि ग्रामविकास संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी तथा संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गट बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विनायक एंटरप्रायझेसच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मनोगतामध्ये बापूसाहेब सुराळकर, नंदिनी सुराळकर आणि किरण गायकवाड यांनी रेणुका कोल्हे यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमास येसगावचे सरपंच पुंडलिक गांगुर्ड, माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा सौ. नंदिनी सुराळकर, येसगाव सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, उपसरपंच संदीप गायकवाड, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य .दत्तात्रय आहेर, शिवाजीराव कोकाटे, गोरख आहेर, दगडू दरेकर, बापूसाहेब सुराळकर,. किरण गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अमोल झावरे, नानासाहेब गायकवाड, शंकरराव पाईक, अभिषेक कोल्हे, . सुमीत दरेकर, पगारे, केंद्रप्रमुख आशिष पारडे, प्रदीप आहेर तसेच . सचिन भालके ,.राजेश पोटलिया , सुरेंद्रकुमार शर्मा.रविंद्र शिंगाडे , रामपाल काला आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक रामदास गायकवाड यांनी केले, तर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विनायक एंटरप्रायझेसचे प्रतिनिधी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व येसगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.









