banner ads

एस.एस.जी.एम.मध्ये क्रिकेटपटूंसाठी सराव नेट्सची सुविधा

kopargaonsamachar
0

 एस.एस.जी.एम.मध्ये क्रिकेटपटूंसाठी सराव नेट्सची सुविधा

कोपरगाव समाचार -: रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेजच्या शालेय तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा तसेच सिनियर कॉलेजच्या विद्यापीठस्तरीय क्रिकेट स्पर्धांच्या तयारीसाठी क्रिकेट सराव नेट्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सराव नेट्सचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. संदीप वर्पे, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.    




 उद्घाटनप्रसंगी अॅड. संदीप वर्पे यांनी, “खेळाडूंनी सांघिक भावना व खिलाडूवृत्ती जोपासून सातत्यपूर्ण सराव करण्याचे आवाहन करत खेळाडूंसाठी आधुनिक क्रिकेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील”, असे सांगितले. तसेच सुनील गंगुले यांनीही खेळाडूंनी नियमित व सातत्यपूर्ण सरावातून आपल्या खेळात प्रावीण्य मिळवावे असे आवाहन केले.



प्रमुख उपस्थिती लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “युवा  क्रिकेट खेळाडूंना  सरावासाठी आवश्यक असणारे साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील” अशी ग्वाही दिली.


    यावेळी वरिष्ठ  कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम  भगत, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार,  क्रीडा शिक्षक श्री. कदम, ज्युनिअर कॉलेज विज्ञान विभागप्रमुख प्रा. गोराणे, वाणिज्य विभागप्रमुख श्री. शांतीलाल  अग्रवाल, रविंद्र हिंगे,  क्रिकेट मार्गदर्शक शिंदे,  चव्हाण एस. जे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!