खिर्डी गणेश सब स्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा
कोपरगाव समाचार:-भारनियमन रद्द करा अन्यथा खिर्डी गणेश सब स्टेशनला टाळे ठोकू असे निवेदन नाटेगाव येथील शेतकऱ्यांनी खिर्डी गणेश सब स्टेशन चे अभियंता यांना दिले.
आपल्या निवेदनात ग्रामस्थ पुढे म्हणाले की,
सद्या वीज वितरण कंपनी कडून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भार नियमन केले जात आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटून गेला आहे शेतकरी सोयाबीन मका पेरणी करून बसले आहे. बी बियाणे खते यावर मोठा खर्च झाला आहे. पावसाने दडी मारल्या मुळे शेतकरी सद्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.विहिरीत असलेल्या थोड्या फार पावसावर पिके जगवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. स्प्रिंकलर वर पाणी देऊन खर्च व पीक वाचवण्याची धडपड सुरु असताना वीज वितरण कंपनीने नाटेगाव येसगाव, खिर्डी गणेश अंचलगाव तसेच ग्रामीण भागात भार नियमन वाढवले आहे त्या मुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. शाळा सुरु झाल्याने व भार नियमन सुरु असल्याने विध्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे भार नियमानाचा वेळ कमी करून उच्च दाबाने वीज पुरवठा करावा. त्याच प्रमाणे सब स्टेशन येथे पूर्ण वेळ चोवीस तास वीज उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी अभ्यासिका सुरु करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आठ दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास खिर्डी गणेश सब स्टेशनला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कोंडून घेण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर बाळासाहेब रंगनाथ मोरे गणेश वसंत मोरे,सौरभ वर्पे अभिजित मोरे लक्ष्मण मोरे जालिंदर मोरे, पांडुरंग तांबे, ऋषिकेश मोरे, बापू नरोडे,संदीप शिंदे,सचिन पोळ, मच्छिन्द्र मोरे,सोपान मोरे गणेश मोरे आदींच्या सह्या आहेत
तसेच या बाबत नाटेगांव ग्रामपंचायत यांनी देखील भारणीयमाची वेळ बदलावी अशी मागणी केली आहे





