banner ads

ओगदी–करंजी रस्ता रखडला; २० जुलैपासून ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण!

kopargaonsamachar
0

ओगदी–करंजी रस्ता रखडला; २० जुलैपासून ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण!

कोपरगाव समाचार : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ओगदी ते करंजी (ता. कोपरगाव) या सुमारे ३.४०० कि.मी. रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत २० जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून करंजी येथील मारुती मंदिरासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.




निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ९ ऑक्टोबर २०२४ रोजी भूमिपूजन करण्यात आले होते. माहिती फलकानुसार ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र काम संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी ते पूर्णपणे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.




सध्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कामातील दिरंगाई व निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या :रखडलेले रस्त्याचे काम तात्काळ युद्धपातळीवर सुरू करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे.कामातील दिरंगाईस जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई करावी.रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी.काम पूर्ण होण्याचा निश्चित कालावधी जाहीर करून ग्रामस्थांना माहिती द्यावी.


ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, २० जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान अथवा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.आंदोलनात गणेश भिंगारे, अजय भिंगारे, आप्पासाहेब भिंगारे, ज्ञानेश्वर आगवण, संजय शिंदे, भाऊसाहेब कदम, बाळू आगवण, चांदभाई पठाण, संदीप कापसे, लक्ष्मण भिंगारे, दत्तात्रय आगवण यांच्यासह ग्रामस्थ सहभागी होणार असून "रस्ता द्या... अन्यथा बेमुदत उपोषणाला सामोरे जा!" असा थेट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!