banner ads

नाट्यगृहाची जागा बदला, पण 'अण्णाभाऊ साठे' नाव नाही

kopargaonsamachar
0

नाट्यगृहाची जागा बदला, पण 'अण्णाभाऊ साठे' नाव नाही!आ. आशुतोष काळेंचे स्पष्ट निर्देश

कोपरगाव समाचार :- कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्या जागेचा करार शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे यदाकदाचित नाट्यगृहाची जागा जरी बदलावी लागली तरी चालेल पण ज्या ठिकाणी नाट्यगृह होणार त्या नाट्यगृहाचे नाव बदलता कामा नये असे स्पष्ट निर्देश आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिले.


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण, नाट्यगृह आणि समाज मंदिर उभारणी आदी मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुरुवार (दि.१६) रोजी आ.आशुतोष काळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी ते म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण कधी आणि कशा पद्धतीने करायचे याचा निर्णय संपूर्ण समाज बांधवांनी एकत्रित बसून घ्यावा. लोकार्पण कार्यक्रम कधी घ्यायचा व कसा घ्यायचा याची रूपरेषा सांगा. सर्वानुमते होणारा हा निर्णय नगरपालिका प्रशासनाला कळवा. त्याप्रमाणे समाज बांधवांच्या मागणी प्रमाणेच नगरपालिका प्रशासन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळ्याची अंमलबजावणी करेल अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली.





तसेच कोपरगाव शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य नाट्यगृहाच्या उभारणीसाठी ५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ज्या जागेवर हे नाट्यगृह उभारण्याचे नियोजन करण्यात आहे त्या जागेच्या कराराची कायदेशीर प्रक्रिया सध्या शासनाकडे प्रलंबित आहे. शासनाकडून ही करार प्रक्रिया पूर्ण होताच नाट्यगृहाचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल. त्याबाबत माझा पाठपुरावा सुरूच असून मुख्याधिकाऱ्यांना पण पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.त्याबाबत समाज बांधवांनी देखील पालिकेकडे पाठपुरावा करावा.ज्या ठिकाणी नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी नाट्यगृह बांधा परंतु नाट्यगृहाच्या नावात कोणताही बदल न करता या नाट्यगृहाला साहित्यरत्न डॉ.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हेच नाव राहिले पाहिजे असे स्पष्ट निर्देश आ.आशुतोष काळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या समक्ष कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकट यांना दिले आहे.तसेच समाज बांधवांनी समाजमंदिरासाठी जी जागा अपेक्षित धरली आहे त्या जागेबाबत मुख्याधिकारी माहिती घेवून निश्चितपणे कार्यवाही करतील असे सांगितले.


यावेळी नितीन साबळे, अर्जुन मरसाळे, फकीरा चंदनशिव, अनिल पगारे, रवींद्र डोलारे, शरद त्रिभुवन, अनिल मरसाळे, रंगनाथ मरसाळे, तेजस साबळे, नितीन ताकवले, साई आवारे, संतोष मरसाळे, सिद्धेश खडांगळे, दीपक मरसाळे, ज्ञानेश्वर घोडेस्वार, किरण गायकवाड, सचिन अहिरे, विजय मरसाळे, पप्पू उगले, योगेश उशीर, साई चंदनशिव, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप कपिले, राहुल शिरसाठ, वाल्मिक लहिरे, हाजीमेहमूद सय्यद, विजय त्रिभुवन, रमेश गवळी, नितीश बोरुडे,सिद्धार्थ शेळके कोपरगाव नगरपालिका अधिकारी आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!