banner ads

वडगांव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

kopargaonsamachar
0

 वडगांव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

कोपरगाव समाचार:--कोपरगाव तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. अरुणा गोपीनाथ केदार यांना पदावरून हटविण्यासाठी सदस्यांनी केलेल्या ठरावाच्या विरोधात सौ. केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी येत्या ८ जुलै २०२६ रोजी पुढील सुनावणी घेण्याचा तसेच उपसरपंचपदाची निवडणूक पुढील सुनावणीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला.





या प्रकरणाची माहिती अशी की वडगांव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच सौ.अरुणा गोपीनाथ केदार यांच्या पदाला आव्हान देत ग्रामपंचायतीमधील काही सदस्यांनी त्यांच्या विरोधात दिनांक २३ मार्च २०२६ रोजी अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने जा. क्र. ०९ / २०२६, दि. २१ जून २०२६ नुसार उपसरपंचपदाची निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते. या निर्णयास आव्हान देत सौ. केदार यांनी मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. त्यावर दि. २४ जून २०२६ रोजी सुनावणी होऊन न्यायमूर्ती चपळगावकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै २०२६ रोजी करण्याचे आदेश देऊन तोपर्यंत वडगांव ग्रामपंचायतीने उपसरपंचपदाची निवडणूक स्थगित ठेवावी असा आदेश दिला.




 हा आदेश देताना न्यायमूर्तींनी काही मुद्दे उपस्थित केले असून त्यात अविश्वास आणणाऱ्या सदस्यांनी उपसरपंचावर अविश्वास दाखल करण्याच्या बैठकीसाठी उपसरपंच सौ. केदार यांना सहभागी होण्याची संधी दिली नाही. बैठकीची माहिती जाणीवपूर्वक गोंधळात टाकणारी होती तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन न करता अविश्वास ठराव प्रक्रिया राबविण्यात आली आदी मुद्द्यांचा समावेश आहे


या प्रकरणाच्या सुनावणीत याचिकाकर्त्या सौ. अरुणा केदार यांच्यावतीने ॲड. गणेश गाढे, ॲड. पार्थ शिंदे यांनी बाजू मांडली तर राज्य शासनाच्यावतीने ॲड. सांगळे यांनी काम पाहिले. याचिकेची सुनावणी आता ८ जुलै २०२६ रोजी होणार असून अविश्वास ठरावातील वैधता, प्रक्रियेतील त्रुटी आणि उपसरपंचांच्या हक्काबाबतचा हा लढा कोणते वळण घेणार हे पुढील सुनावणीच्या वेळी समजेल. दरम्यान या प्रकरणी सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!