banner ads

कै. सखाहरी उगले यांचे निधन.

kopargaonsamachar
0

 

कै. सखाहरी उगले यांचे निधन.


कोपरगांव  समाचार:--संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व तालुक्यातील मळेगांवथडी येथील प्रगतशिल शेतकरी व कै. सखाहरी सावळेराम उगले (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, सुर्यभान व रमेश दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संजीवनी पतसंस्थेचे संचालक रमेश यांचे ते वडील होते



.
         माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रत्येक राजकीय संघर्षात विश्वासु सहकारी म्हणून कै. सखाहरी उगले यांनी अनेकवर्षे काम पाहिले. स्मितभाषी, मनमिळावू स्वभावामुळे ते अनेकांना परिचित होते.

त्यांच्या पार्थीवावर मळेगांवथडी येथे अंत्यसंस्कार करण्यांत आले याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. कै. सखाहरी उगले यांच्या निधनाबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम, अरुणराव येवले आदिंनी शोक व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!