रुग्णसेवेचा सातत्यपूर्ण सुरू असलेला यज्ञ कौतुकास्पद --राजेश परजणे
वारीत मोफत सर्व रोग निदान शिबिरात 195 रुग्णांची तपासणी
कोपरगाव समाचार -: समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंत गोरगरिबांची सेवा करण्याची आवड असताना
दुर्दैवाने नियतीच्या फेऱ्यात माझा तरुण सहकारी राहुल टेके हा पाच वर्षांपूर्वी आपल्यातून कायमचा निघून गेला. परंतु अशावेळी त्याचे समाजाप्रती असलेले दातृत्वरुपी सामाजिक कार्य गेली पाच वर्ष सातत्यपूर्ण सुरू आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा हा सातत्यपूर्ण यज्ञ कौतुकास्पद असल्याचे भावनिक उद्गार कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ शुक्रवारी (दि.22) वारी येथे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, वारी, एस.जे.एस. हॉस्पिटल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राथमिक आरोग्य केंद्र, वारी यांच्या विशेष सहकार्याने मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी परजणे बोलत होते. यावेळी बी.पी., शुगर, टू-डी इको, ई.सी.जी. तपासनी
बायपास, एन्जियोग्राफी, मोफत औषधे, एन्जिओप्लास्टी, सोनोग्राफी तसेच अनेक शस्त्रक्रिया संदर्भात 195 रुग्णांणी स्वतःची मोफत तपासणी करून लाभ घेतला.
याप्रसंगी प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, ग्रा.पं. सदस्य दिलीप काकळे, अनिल गोरे, दौलत वाईकर, योगेश झाल्टे, राजेंद्र टेके, संजय टेके, अण्णासाहेब टेके, नरेंद्र ललवानी, मदन काबरा, अशोक मलिक,राजेंद्र मुरार, स्मिता काबरा, निर्मला भारूड, प्रणाली देशमुख, दिनेश निकम, डॉ. ऋषिकेश रासने, अण्णा खवले,विजय नवले, संजय थोरात, पंडित वीर, राजेंद्र तिवारी, प्रकाश सोनवणे,दिलीप गडकरी,उत्तमराव वाकचौरे, बाळासाहेब आवारे यांच्यासह एस. जे. एस. हॉस्पिटलचे समन्वयक महेश रक्ताटे, हॉस्पिटलचे सर्व तज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे स्वयंसेवक तसेच राहुल दादा मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी केले. तर माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.







