banner ads

ज्या मैदानावर विरोध झाला, त्याच मैदानावर आमदार म्हणून विवेक कोल्हेंचा गौरव

kopargaonsamachar
0

 

ज्या मैदानावर विरोध झाला, त्याच मैदानावर आमदार म्हणून विवेक कोल्हेंचा गौरव


कोपरगाव समाचार:--श्री गणेश परिसराच्यावतीने आमदार विवेक कोल्हे यांचा नागरी सत्कार विरभद्र महाराज मैदान राहता येथे संपन्न झाला.यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी सत्कार व शुभेच्छा देण्यासाठी लावलेली हजेरी उल्लेखनीय ठरली.युवानेते विवेक कोल्हे यांची लोकप्रियता आणि त्यांच्या राहता येथील भूमिकेला ऐकण्यासाठी हजारो नागरिकांनी उस्फुर्त गर्दी केली होती.



विवेक कोल्हे यांनी सत्काराला उत्तर देताना आपली रेष मोठी करण्याचे सकारात्मक राजकारण करण्यात मला रस आहे.गणेश परिसराने स्व.शंकरराव कोल्हे यांच्यासारखे गुण माझ्यात असल्याची जाणीव करून दिली त्यानंतर क्रांती घडली.अतिशय कष्टातून आपण गणेश कारखाना सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.ऊसाला सर्वोच्च भाव देऊन १७७ कोटी रुपये पर्यंत रक्कम शेतकरी जीवनात आर्थिक चक्र फिरवण्यात वितरित झाली.१४ कोटीपर्यंत जुनी देणी देत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.आम्ही कुणाचाही व्यक्तिद्वेष करत नाही फक्त संस्थाहित जपले पाहिजे हा एकमेव आग्रह आहे.


पूर्वी सत्ताधारी पक्षात होतो पण सत्तेत नव्हतो आता सत्तेत देखील आहे.आपण शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढवली मात्र त्यात जे घडले ते आज समाधान आहे कारण तसे झाले नसते तर कदाचित अमित शाह यांच्याशी भेट झाली नसती.आता आपल्याल केवळ पाच जिल्ह्यापुरते नाही तर संपुर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र मिळाले आहे त्यात राहता आणि लोणी देखील येते असे विधान करताच एकच जल्लोष झाला.
एक हक्काचा व्यक्ती आमदार म्हणून आहे त्यामुळे अर्ध्या रात्री तुमच्यासाठी उभा असेल.तुमच्याप्रती असणारी जबाबदारीची मला जाणीव आहे.पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवणे,विजेचे प्रश्न, निळवंडेचे पोटचऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न्वत राहू.अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण हॉटलाइन आहोत त्यामुळे आपली कामे अडणार नाहीत यासाठी विशेष लक्ष देऊ असा विश्वास कोल्हे यांनी दिला.

श्री गणेश कारखाना ताब्यात आला तेव्हा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून मार्ग काढून आपण कारखाना सुरळीत करण्यासाठी काम केले. अनेक अडथळे आणण्याचा गणेश विरोधक प्रयत्न करत आहेत त्यांना विनंती असेल आपण लोकशाही मार्गाने सभासदांना निवडणुकीत कौल मागा मात्र असे आर्थिक त्रास देण्याचे राजकारण करू नका. या कामधेनुला विनाकारण त्रास दिला तर गणेश विरोधकांना एकच सांगेल घायल होता हू तब घातक होता हुं असे म्हणत सूचक संदेश देखील दिला.
प्रभावतीताई घोगरे,सुहास वहाडणे,नारायणराव कार्ले,डॉ.राजेंद्र पिपाडा,विराट पुरोहित,रणजित बोठे आदींनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.


गणेश कारखाना निवडणुकीवेळी हेच मैदान सभेसाठी नाकारले गेले होते,त्यानंतर विवेक कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विरोध करण्यात होता त्याच मैदानावर आमदार म्हणून त्यांचा सत्कार झाला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेशचे माजी संचालक रामचंद्र बोठे हे होते. काँग्रेस नेत्या प्रभावतीकाकी घोगरे, ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, ॲड. शिवाजी कोते, शिवाजी तात्या लहारे, भाजपा नेते राजेंद्र पिपाडा, गणेशचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, विराट पुरोहित,शिवसेना (उबाठा) चे सोमनाथ गोरे, शिवाजीराव गोंदकर, ॲड. नारायणराव कार्ले, भाऊसाहेब चौधरी,सचिन तांबे,सुरेश थोरात,नगरसेवक शशिकांत लोळगे, सचिन चौघुले,राजेंद्र अग्रवाल, आप्पासाहेब दंडवते, गणेश सोमवंशी, विजय मोगले, भाऊसाहेब थेटे, संजयराव सोमवंशी, वसंतराव चोळके, चंद्रभान गुंजाळ, विलासराव टिळेकर, वसंतराव गायकवाड, उत्तमराव घोरपडे, गणपतराव धरम, सुरेशराव गमे, नानासाहेब शेळके, संजय शेळके, संजयराव सरोदे, चंद्रभान धनवटे, शंकरराव जेजुरकर, सुरेश थोरात, धनंजय गाडेकर, अनिल बोठे, सिमोन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!