banner ads

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत संवत्सर परिसरात चर दुरुस्ती - परजणे

kopargaonsamachar
0

 

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत संवत्सर परिसरात चर दुरुस्ती - परजणे


कोपरगाव समाचार:-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन तसेच राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार २.० योजनेअंतर्गत व श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संवत्सर परिसरातील चर खोलीकरण व रुंदिकरण कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.






जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांच्याहस्ते या दोन्हीही कामांचा शुभारंभ करण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना श्री परजणे यांनी संबंधितांना दिल्या. आपल्या भाषणातून श्री परजणे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ही श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८१ मध्ये सुरु झालेली सेवाभावी संस्था आहे. ग्रामीण विकास आणि प्रामुख्याने जलसंधारणावर या संस्थेचा विशेष भर असतो. शेतामध्ये चर तयार करुन त्याद्वारे पावसाचे पाणी अडवणे व जमिनीत मुरवणे, जमिनीची धूप थांबविणे, भूजल पातळी वाढविणे, पिकांसाठी ओलावा टिकवून ठेवणे यासाठी चरांचा चांगला उपयोग होतो. आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था केवळ आध्यात्मिक शिक्षण देणारी संस्था नसून समाजातील सकारात्मक बदल घडवून आणणारी एक मोठी चळवळ आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास, योग आणि ध्यान प्रशिक्षण, नशामुक्ती अभियान, महिला सशक्तीकरण, कैद्यांसाठी पुनर्वसन कार्यक्रम अशा विविध


 उपक्रमांबरोबर व्यक्तिच्या अंतर्गत शांततेपासून समाजाच्या कल्याणापर्यंत या चळवळीचा प्रभाव दिसून येतो. या संस्थेच्या कार्यासाठी लोकांचा सहभाग आणि सहकार्य मिळणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त करुन संवत्सर परिसरात दहा ते पंधरा चर असून त्यांचे खोलीकरण व रुंदिकरण करण्याबरोबरच त्यातील गाळ काढून पाणी अडविण्याची व ते जमिनीत जिरण्याची क्षमता वाढविण्याचे काम याद्वारे होणार आहे. शेतकऱ्यांनी या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहनही श्री परजणे यांनी यावेळी केले.
संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे यांनी प्रास्ताविकातून चर खोलीकरण व रुंदिकरणाबाबत माहिती दिली. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे तालुका समन्वयक सुधीर जायभाय, सुपरवायझर श्री जोंधळे, जलसंधारणचे श्री शिवम सोनवणे, पंचायत समितीचे एकात्मिक महिला व बालविकास योजनेचे पंडितराव वाघिरे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजेंद दिघे, शाखा अभियंता आश्विन वाघ, श्रीमती खोले, ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे, दिलीपराव ढेपले, बाजार समितीचे संचालक खंडू फेपाळे, लक्ष्मणराव साबळे, चंद्रकांत लोखंडे, शिवाजीराव गायकवाड, लक्ष्मणराव परजणे, अनिल आचारी, अविनाश गायकवाड, राजेंद्र भोकरे, दीपक गव्हाळे, रामभाऊ निरगुडे, सोमनाथ घेर, कृष्णा आबक, लक्ष्मणराव पेकळे, हबीब तांबोळी, सुभाष मेहेत्रे, अशोक मेहेत्रे, मारुती निरगुडे यांच्यासह संवत्सर परिसरातील अनेक ग्रामस्थ, शेतकरी, शासकीय अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!