येसगावच्या शेतकऱ्याची लेक ठरली ‘कर सहाय्यक’ अधिकारी
कोपरगाव समाचार:--कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी स्नेहल अशोक आहेर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत यश मिळवत ‘GST कर सहाय्यक अधिकारी’ पदावर निवड मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे तिचा व तिच्या आई-वडिलांचा शाळेच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी स्नेहल आहेर हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या यशाचा प्रवास उलगडला. जिद्द, चिकाटी आणि स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने परिश्रम घेतल्यामुळे हे यश मिळाल्याचे तिने सांगितले. तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यानेच आपण या टप्प्यावर पोहोचल्याचे तीने नमूद केले.
पुढे बोलताना, आपल्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन गावातून अधिकाधिक अधिकारी घडावेत, अशी अपेक्षा स्नेहलने व्यक्त केली.
या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव गायकवाड, गोरख आहेर, शिवाजीराव कोकाटे, भास्कर आहेर, अतुल सुराळकर, अशोक आहेर,स़ंदिप गायकवाड शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंब्रे , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








