banner ads

झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटींचा निधी

kopargaonsamachar
0

 

झगडे फाटा–रांजणगाव देशमुख रस्त्यासाठी १७ कोटींचा निधी

दर्जेदार कामासाठी नागरिकांचा ठाम आग्रह
कोपरगाव समाचार :- राज्य मार्ग ६५ वरील झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (तालुका हद्द) रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा १७ कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे व रस्त्याच्या कामाची गुणवत्ता दर्जेदार असावी अशी मागणी पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे केली.






आमदार आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवार (दि.०९) रोजी पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरीकांगाच्या समवेत झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख (तालुका हद्द) रस्त्याची संयुक्तिक पाहणी केली यावेळी उपस्थित होते. या रस्त्याला यापूर्वीही आमदार आशुतोष काळे यांनीच १६.०५ कोटी निधी दिला होता. परंतु रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी पाया भक्कम नसल्यामुळे हा रस्ता दुरुस्त होवूनही बेसुमार अवजड वाहतुकीमुळे टिकू शकला नाही. त्यामुळे या मार्गावरची अवजड वाहतूक पाहता हा मार्ग सावळीविहीर फाटा ते कोपरगाव  या रस्त्याच्या धर्तीवर सिमेंट कॉंक्रीट करण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे व त्या पाठपुराव्याला यशही मिळणार असून या या रस्त्याची साडेसाती कायमची दूर होणार आहे. परंतु तोपर्यंत नागरीकांना होत असलेली खराब रस्त्याची अडचण दूर करण्यासाठी त्यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पामध्ये मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते आणि पुलांच्या कामांचा समावेश करून २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून घेतला असून त्यापैकी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा १७ कोटी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे या १७ कोटीच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करतांना रस्त्याचे काम दर्जेदार कसे होईल असे अंदाज पत्रक तयार करावे अशा सूचना पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरीकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे मांडल्या.
या सूचनांचा आदर करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता वर्षराज शिंदे यांनी रस्त्याचे काम दर्जेदार होईल या पद्धतीनेच अंदाजपत्रक तयार करण्याचे आश्वासित करून आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार आवश्यक ठिकाणी सी.डी. वर्क व योग्य उपाय योजना देखील  करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रविण शिंदे, कोपरगाव एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, संचालक शंकरराव चव्हाण,गंगाधर औताडे, सुनिल शिंदे, सचिन रोहमारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, पद्मविभुषण डॉ. शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गौतम बँकेचे संचालक बाबुराव थोरात, संतोष वर्पे, राष्ट्रवादीचे सोशल मेडिया जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र औताडे, गजानन मते, शरद होन, संदिप थेटे, राजाभाऊ होन, दिपक रोहमारे, नंदकिशोर औताडे, राजेंद्र पाचोरे, संदिप रोहमारे, चांगदेव शिंदे, वाल्मिक नवले, वरुण रोहमारे, योगेश औताडे, राजेंद्र औताडे, जगदीप रोहमारे, रमेश औताडे, गोकुळ पाचोरे, कृष्णा औताडे, सुशिल औताडे, ज्ञानेश्वर गव्हाणे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोहेगाव व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!