महाबळेश्वर टूर ठरली दुर्दैवी; सोनेवाडीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
कोपरगाव समाचार -:कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील चि. संकेत विठ्ठल जाधव या २४ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. चि. संकेत यांच्या मृत्यूच्या बातमीने सोनेवाडी गावावर शोककळा पसरली . सोमवारी सकाळी साडेसात वाजता त्यांच्या पार्थिवावर सोनेवाडी अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
Home first finance मध्ये संकेत अहिल्यानगर येथे सावेडी शाखेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. महाराष्ट्र मध्ये असलेल्या सर्व शाखेमधील काम पाहत असणाऱ्या व्यवस्थापकांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना महाबळेश्वर येथे विरंगुळा व आनंद घेण्यासाठी फायनान्स कंपनीने टूरचे आयोजन केले होते. मात्र संकेतच्या मृत्यूने या आनंदाचे होत्याचे नव्हते झाले.
आपल्या 56 मित्रासोबत संकेत शनिवारीच महाबळेश्वर गेला होता. एमबीए पूर्ण करून त्याने संगीत शास्त्रात देखील विशारद म्हणून नाव कमवले होते.
रविवारी सकाळी सात वाजता आपल्या एका मित्रासोबत कोयना बॅक वॉटर च्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी तो गेला. आणि तीच आंघोळ त्याची शेवटची ठरली.वानवली,सोळसी येथे बॅकवॉटरमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संकेत पाण्यात गेल्यानंतर कडेला आलाच नाही. हे त्याच्या काठावर बसलेले मित्राला समजले. त्याने आरडाओरडा करत आपल्या सर्व मित्रांना या घटनेची माहिती दिली. स्थानिकांच्या मदतीने संकेतला बाहेर काढण्यात आले. महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले .
घटनेची माहिती मित्रांनी सोनेवाडी येथे दिली असता संकेतचे काका गोकुळ जाधव व भाऊ उध्वस्त जाधव महाबळेश्वर येथे तातडीने पोहोचले. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल संकपाल,
माजी उपसरपंच किशोर जावळे व मित्र परिवाराने पुढील तपास कामासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस हवालदार श्री कांबळे व श्री सय्यद यांना घटनास्थळी पाठवत सर्व कारवाई पूर्ण केली . रविवारी नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. सोमवारी सकाळी सोनेवाडी येथे अंत्यसंस्कार झाले. अक्षय तृतीयेला आपल्या घराचे स्वप्न उराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी संकेत प्रयत्न करत होता. आई वडील डोळ्यात तेल घालून संकेतला येण्याची वाट बघत होते मात्र या घटनेने सर्वच स्वप्नभंग झाली . संकेत च्या पक्षात आजी दगुबाई जाधव,वडील विठ्ठल जाधव आई लिलाबाई जाधव,काका गोकुळ जाधव, भाऊ अनिकेत व उद्धव जाधव असा परिवार आहे.
घराचे काम अक्षय तृतीयेला सुरू करायचे होते तेव्हा कंपनीच्या ट्रीपसाठी संकेत जाणार नव्हता. त्याने आपल्या वरिष्ठांना याबाबत सांगितले होते. मात्र संकेतचा स्वभाव मनमिळावू असल्याने व त्याचे गायन व संगीतात अभ्यास असल्याने त्याला वरिष्ठांनी आग्रह केला होता. शनिवारी रात्री सगळ्यांना त्याने आनंद दिला मात्र रविवार हा त्याच्यासाठी शेवटचा दिवस ठरला.




