ज्योती पतसंस्थेची दमदार झेप; ६७४ कोटींचा व्यवसाय गाठला– ॲड. रविकाका बोरावके
कोपरगाव समाचार --:नुकत्याच झालेल्या 2025 - 26 या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला 4 कोटी पन्नास लाख रुपये चा नफा झाला आहे यामध्ये 406 कोटी रुपयांच्या ठेवी तर 268 कोटी रुपयांची कर्ज वितरित केली आहे संस्थेची गुंतवणूक 164 कोटी रुपयांची झाली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 674 कोटी इतका झाला आहे. शून्य टक्के एन. पी.ए.मुळे आपल्या ठेवी याच संस्थेत शंभर टक्के सुरक्षित आहे अशी खात्री ठेवीदारांना झाली आहे व ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲड. रवी काका बोरावके यांनी दिली .
सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भाग भांडवलात व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे लेखा परीक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पूर्ण करून सन 2024 - 25 या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परीक्षणात "अ" वर्ग मिळवला आहे संस्थेने आवश्यक ती प्रमाणाके पूर्ण करून ठेवी कर्जे भाग भांडवल व गुंतवणूक या सर्वांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. संस्थेच्या 38 वर्षाच्या वाटचालीमध्ये सातत्याने विश्वास वाढतच चाललेला आढळून येतो आपल्या चोक व्यवहारामुळे संस्थेस "सर्वोत्तम पतसंस्था "पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून ही ओळख निर्माण झाली आहे
कर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली यापुढे यात सातत्य राखले जाऊन नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे .तसेच संस्थेने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे व पुढेही घेत राहील अशी माहिती संस्थेचे चेअरमन ॲड रवी काका बोरावके यांनी दिली .संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार खातेदार, कर्जदार ,व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी संस्थेचे सर्व संचालक शाखा अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे . असल्याचे संस्थेचे चेअरमन ऍड रवी काका बोरावके यांनी सांगितले संस्थेच्या आर्थिक प्रगती बाबत मागील वर्षाच्या तुलनेत ठेवीमध्ये 46 कोटी रुपयांची वाढ झाली असून तिचे प्रमाण 13% आहे तसेच कर्जामध्ये 33 कोटी रुपयांची वाढ झाली असून तिचे प्रमाण 14% व गुंतवणुकीमध्ये 16% इतकी वाढ झाली आहेत अशी माहिती संस्थेची व्यवस्थापक सुरेश शिंदे यांनी दिली संस्थेच्या एकूण व्यवसाय 674 कोटी इतका झाला असून त्याचे प्रमाण 13% इतकी वाढ झाली आहे संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के राखण्याची परंपरा कायम ठेवली आहे तसेच सहकार खातेचे नियमाचे पालन केलेले आहे अशी माहिती संस्थेचे असि .मॅनेजर सुनील क्षिरसागर यांनी दिली
संस्थेची वाढती प्रगती पाहता आगामी काळातही ज्योती पतसंस्था अधिक सक्षमपणे आर्थिक क्षेत्रात योगदान देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







