banner ads

नामस्मरण व भक्तीनेच जीवनाला दिशा – उद्धव महाराज कदम

kopargaonsamachar
0

 

नामस्मरण व भक्तीनेच जीवनाला दिशा – उद्धव महाराज कदम


लक्ष्मीआई मंदिर जिर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त कीर्तन सेवा संपन्न
कोपरगाव समाचार :-मानव जीवनातील सर्व दुःख, ताणतणाव आणि संकटांवर मात करण्यासाठी नामस्मरण आणि भगवंताची अखंड भक्ती हा सर्वोत्तम व सोपा मार्ग आहे. श्रींचे नाम घेणारा कधीच निराश होत नाही,” असे प्रतिपादन भागवताचार्य उद्धव महाराज कदम यांनी केले.



खिर्डी गणेश येथे लोकवर्गणीतून लक्ष्मीआई मंदिराच्या जिर्णोद्धार व नव्याने स्थापित करण्यात आलेल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सेवेत ते बोलत होते.


यावेळी श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी महाराज) समाधी स्थानाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज , सोमनाथ महाराज मोरे, भानुदास महाराज रोहोम, रवींद्र महाराज रोहोम, ज्ञानेश्वर भजनी मंडळ ,गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे,संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे ,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, आदींसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते


महाराज पुढे म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या आणि भौतिकतावादी जीवनात माणूस मानसिक शांततेपासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत संतांचा मार्ग, नामस्मरण आणि सत्संग हेच जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत. संत तुकाराम, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली भक्ती हीच खरी जीवनाची शिदोरी असून ती आत्मिक समाधान देते.
कीर्तनात त्यांनी विविध अभंग, उदाहरणे आणि कथा यांद्वारे उपस्थितांना भक्तीमार्गाचे महत्त्व पटवून दिले. “देवाला मोठ्या पूजा-अर्चा नकोत, तर निर्मळ मनाने केलेले नामस्मरण आणि श्रद्धा हवी,” असे सांगत त्यांनी समाजात नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले.

लक्ष्मीआई मंदिराचा जिर्णोद्धार हा ग्रामस्थांच्या सहकार्याने पूर्ण झाला असून, मंदिर परिसर आता अधिक सुशोभित झाला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, पूजन, महाप्रसाद तसेच कीर्तन सेवा यांचा समावेश होता.तीन दिवस चाललेल्या या धार्मिक कार्यक्रमाचे पौराहीत्य बाळासाहेब जोशी,रोहन जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले कार्यक्रमाचे सुत्र संचालन व उपस्थितांचे आभार खिर्डी गणेश सहकारी सोसायटीचे चेअरमन चंद्रभान रोहोम यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!