banner ads

संजीवनी पतसंस्थेस ४ कोटी निव्वळ नफा-विवेक कोल्हे.

kopargaonsamachar
0

 

संजीवनी पतसंस्थेस ४ कोटी निव्वळ नफा-विवेक कोल्हे


कोपरगांव समाचार:-- ग्रामिण अर्थकारणाला पाठबळ मिळावे यासाठी माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी ४२ वर्षापुर्वी संजीवनी पतसंस्थेची स्थापना केली. २०२५.२६ याआर्थीक वर्षात संस्थेला ४ कोटी १ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.





त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, संजीवनी पतसंस्थेस २०२५.२६ या आर्थीक वर्षात ४ कोटी ६८ लाख रूपये ढोबळ नफा झाला असुन ६७ लाख रूपयांची तरतुद करण्यांत आली आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संजीवनी पतसंस्थेने बँकींग क्षेत्रात नव्याने निर्माण होणा-या आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करत कोपरगांव येथे सुसज्ज इमारत उभारली आहे. सभासद ग्राहकांसाठी एनएफटी, आरटीजीएस, अद्यावत लॉकर यासह सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून सुवर्णतारणावर ९ टक्के व्याजदरांने कॅशकेडीट कर्ज सुविधाही दिली आहे. संस्थेकडे २०४ कोटी रूपयांच्या ठेवी असुन १५७ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यांत आले आहे तर पतसंस्थेची ८४ कोटी रूपयांची गुंतवणुक असुन नेट एनपीए शुन्य टक्के, संस्थेचा ३८ कोटी रूपयांचा निधी तर खेळते भाग भांडवल २४९ कोटी रूपये आहे. कोळपेवाडी येथे संस्थेची एक शाखा कार्यरत आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक, सभासद, व्यवस्थापनाच्या सहकार्याने संजीवनी पतसंस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!